पुणे, दि. २५ जून २०२० : आजपर्यंत आपण शालेय पुस्तकांमध्ये पृथ्वीवर सात खंड असल्याचे अभ्यासले होते. परंतू शास्त्रज्ञांच्या नव्या दाव्यानुसार पृथ्वीवर आठ खंड असल्याचे म्हटले जात आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आठवा खंड समुद्राच्या खाली झाकला गेला आहे. शास्त्रज्ञाने या खंडाचा नकाशा देखील बनवला आहे. या नकाशानुसार असे समजते की हा नवीन खंड तब्बल ५० लाख वर्ग किलोमीटर एवढा मोठा आहे. जर या खंडाची भारताच्या क्षेत्रफळाशी तुलना केली तर भारताचा क्षेत्रफळाच्या जवळपास १७ लाख वर्ग किलोमीटर एवढा मोठा हा खंड आहे. भारताचे क्षेत्रफळ ३२.८७ लाख वर्ग किलोमीटर आहे.
या आठव्या खंडाचे नाव जीलैंडिया आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की सुमारे २३० दशलक्ष वर्षांपूर्वी हा खंड समुद्रात बुडाला होता. जीलैंडिया सुपरकॉन्टीनेंट गोंडवानालैंड पासून ७.९० कोटी वर्षापूर्वी वेगळा झाला होता. आता न्यूझीलंडच्या शास्त्रज्ञांनी त्याचा टेक्टोनिक आणि बाथमेमेट्रिक नकाशा तयार केला आहे. जेणेकरून येथील भूकंपीय हालचाली आणि त्या भागातील समुद्र याविषयी माहिती मिळू शकेल.
जीएनएल विज्ञान भूगर्भशास्त्रज्ञ निक मॉर्टिमर या नकाशा बाबत सांगताना म्हणाले की, हे नकाशे आपल्याला जगाविषयी विस्तारित माहिती देतात. हे नकाशे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून आपल्यासाठी ही एक मोठी वैज्ञानिक उपलब्धता आहे. निक म्हणाले की, आठव्या खंडाची संकल्पना १९९५ मध्ये आली होती. परंतू हे शोधण्यासाठी २०१७ पर्यंत वेळ लागला आणि नंतर तो हरवलेला आठवा खंड म्हणून ओळखला गेला.
जीलैंडिया पॅसिफिक महासागराच्या आत ३८०० फूट खोलीवर आहे. नवीन नकाशावरून असे दिसून आले आहे की या ठिकाणी जमीन समतल नसून ती वर खाली आहे. काही ठिकाणी उंच टेकड्या आहेत तर काही ठिकाणी अतिशय खोल उतार किंवा दऱ्या आहेत. संपूर्ण जीलैंडिया समुद्राच्या खाली आहे, परंतू लॉर्ड हो आयलँडजवळ, बॉल्स पिरॅमिड नावाचा खडक समुद्राच्या बाहेर डोकावताना दिसत आहे. यामुळेच समजले की समुद्रखली आणखी एक खंड असण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: