शिरसोडी गावचा तीन किलोमीटरचा परिसर केला सील

इंदापूर, दि.१८ मे २०२०: इंदापूर तालुक्यातील शिरसोडी गावात मुंबईहून आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. उर्वरित नागरिकांना या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तब्बल तीन किलोमीटर अंतराचा परिसर आरोग्य विभाग पोलीस यंत्रणा यांनी सील केला असल्याची माहिती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांनी दिली.

यासंदर्भात माहिती देताना डॉ. राजेश मोरे म्हणाले की, प्रामुख्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले की आरोग्य विभाग २ झोन तयार करत असतो. याच पद्धतीने कंटेनमेंट झोनची निर्मिती केली आहे. यामध्ये असणाऱ्या वाड्या-वस्त्या व या गावातील नागरिकांना घराच्या बाहेर पडू दिले जाणार नाही हा पूर्ण परिसर लॉकडाऊन केला आहे.आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वेचे काम ४६ टीम करीत आहेत. या प्रत्येक टीम मध्ये तीन कर्मचारी काम करणार आहे.

तब्बल चौदा दिवस सर्व घरांमध्ये जावून सर्वे केला जाईल . यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांना त्यांचे स्वैब घेऊन १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाईल. या गावातील बारीक-सारीक आजाराचे पेशंट यांना देखील योग्य उपचार केले जातील.जे २ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत ते मुंबईहून आल्यानंतर त्यांना गावातील शाळेमध्ये वेगळे ठेवले होते त्यामुळे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणीही आले नाही.असे असले तरीदेखील या परिसरातील सर्व नागरिकांची योग्य तपासणी आरोग्य विभाग करणार आहे.जवळपास आरोग्य विभागाचे ९२ कर्मचारी अधिकारी अंगणवाडी सेविका ४६ टीम बनवून काम करण्यास सुरुवात केली आहे.

हा सर्वे शिरसोडी भागात १४ दिवस प्रती घर केला जाईल अशीही माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा