झोमॅटोच्या आयपीओसाठी सेबी कडून मंजुरी, इशू होणार एवढे नवीन शेअर

5

पुणे, ४ जुलै २०२१: फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोचा आयपीओ सेबीने मंजूर केला आहे. कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येऊ शकेल आणि जुलैच्या मध्यापर्यंत तो लिस्ट होण्याची शक्यता आहे. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई दोन्ही वर सूचीबद्ध केले जातील. या आयपीओशी संबंधित खास गोष्टी जाणून घ्या.

झोमॅटोचा आयपीओ ८,२५० कोटी रुपयांचा असेल. कंपनीने आयपीओसाठी यावर्षी एप्रिलमध्ये सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) चा मसुदा सादर केला होता. कोणतीही कंपनी आयपीओ आणण्यापूर्वी ही कागदपत्रे सेबीकडे सादर करुन मंजूर करावी लागतात.

आयपीओ आणण्यासाठी झोमॅटोने एप्रिलमध्ये वैयक्तिक खाजगी कंपनीकडून सार्वजनिक कंपनीमध्ये बदल केले. म्हणूनच कंपनीने आपले नाव झोमॅटो लिमिटेड बदलून झोमॅटो प्रायव्हेट लिमिटेड केले आहे.

आयपीओ सुरू करण्यापूर्वी झोमॅटोने फेब्रुवारीमध्ये टाइगर ग्लोबल, कोरा आणि इतरांकडून २५ कोटी डॉलर्स (सुमारे १,८०० कोटी रुपये) जमा केले. यासाठी कंपनीचे बाजार मूल्य ५.४ अब्ज डॉलर्स (अंदाजे ४०२ अब्ज रुपये) होते.

आता हे स्पष्ट झाले आहे की झोमॅटो आयपीओ अंतर्गत जवळपास ७,५०० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करेल. याशिवाय त्यांची मूळ कंपनी इन्फो एज ऑफर फॉर सेल साठी सुमारे ७५० कोटींचे शेअर्स ठेवेल.

गेल्या एका वर्षात आलेल्या बर्‍याच आयपीओपैकी झोमॅटोचा आयपीओ सर्वात मोठा आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल (रेवेन्यू) दुप्पट ३९.४ कोटी डॉलर्स (सुमारे २,९६० कोटी रुपये) झाला आहे.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, मॉर्गन स्टेनली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि क्रेडिट सुइस सिक्युरिटीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या आयपीओचे ग्लोबल कोऑर्डिनेटर आणि लीड मॅनेजर असतील. बोफा सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड आणि सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना झोमॅटोच्या आयपीओचे मर्चेंट बॅंकर केले गेले आहेत.

चीनच्या अँट ग्रुपची झोमॅटोमध्ये मोठी गुंतवणूक आहे. अँट ग्रुप जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या अलिबाबाशी संबंधित आहे. त्यात जॅक मा यांची गुंतवणूक आहे.

पेटीएमची आणखी एक स्टार्टअप कंपनीने २०२१ मध्ये आपला आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीचा आयपीओ २१,८०० कोटी रुपयांचा असू शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा