गुजरात, ११ नोव्हेंबर २०२२: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलीय. काँग्रेस पक्षानं ४६ उमेदवारांची नावं जाहीर केलीय. आतापर्यंत एकूण ८९ जणांना विधानसभेचं तिकिटं देण्यात आलंय. दुसरीकडं आम आदमी पक्ष आणि भाजपनंही उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहे.
उमेदवारांची पहिली यादी
निवडणूक आयोगानं गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर काँग्रेस पक्षानं दुसऱ्या दिवशी ४३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. राज्यसभा सदस्य अमीबेन याज्ञिक, माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढवाडिया आणि मुहवा येथील औद्योगिक प्रकल्पाविरोधात आंदोलन करणारे डॉ.कनुभाई कलसारिया यांच्या नावांचा समावेश आहे. तर आत्ता दुसरी यादी जाहीर केलीय.
उमेदवारांची दुसरी यादी
तर काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत उत्तरमधून अशोक भाई पटेल, वलसाडमधून कमल कुमार पटेल जुनागढमधून भिखाभाई जोशी, आणि सुरत पूर्वमधून अस्लम सायकलवाला, सूरत आणि भुजमधून अर्जन भाई भुडिया या नावांचा यादी मध्ये समावेश आहे. गुजरातमध्ये सत्तेबाहेर असलेला काँग्रेस पक्ष निवडणुकीत विजयासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. तसेच या दरम्यान दिल्ली आणि पंजाब मध्ये सत्तेत आलेला आम आदमी पक्षही या निवडणुकीत उतरल्यानं रंगत वाढली आहे.
भाजप
तर दुसरीकडं सत्ताधारी भाजप पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय, तर या यादीत काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेला पाटीदार नेता हार्दिक पटेल आणि क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांच्या नावांचाही समावेश आहे. भाजपनं पाच विद्यमान मंत्र्यांसह सुमारे ३६ आमदारांची तिकिट रद्द करण्यात आलीय तर या मध्ये मोरबी पुल दुर्घटनेतील आमदारांचा समावेश आहे.
आम् आदमी पक्ष
आम् आदमी पक्षाने १५८ जागांसाठी उमेदवारीघोषित केली आहे. आपनं १८२ पैकी १५८ जागांसाठी उमेदवार घोषित केली आहे. आम आदमी पक्षानं लिंबडीतून मयूर साकारिया, फतेपुरामधून गोविंद परमार, अंजारमधून अर्जन रबारी, चानसामामधून विष्णुभाई पटेल, सयाजीगंजमधून स्वजल व्यास आणि झगडियामधून उर्मिला भगत यांना उमेदवारी दिलीय. गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहे. तर पहिल्या टप्प्यासाठी १ डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबरला मतदान होणार आहे, तर ८ डिसेंबरला निकाल लागणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे