पुणे, दि.१५ मे २०२० : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात १७ मे २०२० पासून लॉकडॉऊन सुरु आहे. ज्या-ज्या भागात परिस्थितीत नियंत्रणात आल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत , त्या भागातील दुय्यम निबंधक कार्यालये, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये व विशेष विवाह कार्यालये पुरेशी खबरदारी घेऊन सोमवार१८ मेपासून सुरु होणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.
हि कार्यालये सुरू करताना त्या पुढील कामकाज करताना कर्मचारी व नागरिक यांनी सोशल डिस्टस्टिंगचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सह जिल्हा निबंधक, पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्याखाली सर्व २१ कार्यालये दस्त नोंदणीसाठी १८ मे २०२० पासून (सद्यस्थितीत घोषित करण्यात आलेले प्रतिबंधित क्षेत्र व भविष्यात घोषित होणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये तो घोषित कालावधी वगळून) सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-२, कार्यालय बारामती क्रमांक-१ सह दुय्यम निबंधक वर्ग-२ कार्यालय बारामती क्रमांक-२, शिरुर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय शिरुर व तळेगाव ढमढेरे, दौंड तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय दौंड व केडगाव, भोर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय भोर, वेल्हा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय वेल्हा, इंदापूर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय इंदापूर, जुन्नर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय जुन्नर व नारायणगाव, आंबेगाव तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय आंबेगाव, पुरंदर तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय पुरदर, मुळशी तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी १ (पौड) व मुळशी २ (हिंजवडी), मावळ तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे व लोणावळा, खेड तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय, खेड १ (खेड), खेड २ (चाकण), खेड ३ (खेड) ही कार्यालये सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: