नवी दिल्ली २३ सप्टेंबर २०२२ : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया विरोधात गुरुवारी देशातील १५ राज्यात १५० ठिकाणी एकाच वेळी NIA ने छापेमारी केली आहे. तर PIF च्या १०६ हून अधिक जणांना अटक करण्यात आली. या ऑपरेशनच्या प्लॅनिंग पासून ते पूर्णत्वास जाईपर्यंत गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे.
२ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे INS विक्रांत युद्धनौका भारतीय नौदलाला सोपवण्यासाठी केरळच्या कोचीमध्ये होते. तर NSA अजित डोवाल पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तिथे उपस्थित होते, पण अजित डोवाल यांचे लक्ष पंतप्रधानाच्या सुरक्षे कडे तर होतेच पण त्यांची एक टीम दुसऱ्याच एका मिशनवर काम करत होती. या मिशन बाबत डोवाल यांच्या मनाची चलबिचल सुरू होती. ते काम होतं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचं देशभरातील संपूर्ण नेटवर्क उखडून टाकने.
NSA अजित डोवाल यांनी PFI विरोधातील मिशन साठी केरळा पोलीस अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीमध्ये अजित डोवाल यांनी केरळ पोलिसांना PFI च्या विशेष प्लॅनची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर डोवाल थेट मुंबईला गेले. लाईमलाईट पासून दूर राहत डोवाल यांनी राज्यपाल भवनात सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, या संपूर्ण मिशनमध्ये सर्जिकल स्ट्राइकच्या ऑपरेशन आणि जम्मू-काश्मीर मधून ३७० कलम हटवण्यात आलेल्या निर्णयासारखी गुप्तता बाळगण्यात आली होती. तसेच या तीन चार महिन्यांपूर्वी देशातील प्रमुख इस्लामिक नेत्यांची भेट घेतली होती.
काल १५ राज्यात PFI कार्यालयावर NIA च्या तब्बल २०० अधिकाऱ्यांनी ही छापेमारी केली तर यात १०० हून अधिक जण टेरर फंडिंग च्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहेत. तर या प्लॅन ची अतिशय सिक्रेट पद्धतीने आखणी केली होती. तर एकाच वेळी १५ राज्यांमध्ये १५० ठिकाणी छापा टाकला आणि दिल्लीत PFI प्रमुख परवेज अहमद यालाही अटक करण्यात आली आहे.
हे ऑपरेशन मध्यरात्री उशिरा एक वाजता सुरू करण्यात आलं. या ऑपरेशन मध्ये ४ IG, १ ADIG ,आणि १६ SP रँक अधिकाऱ्यांचा समावेश होता. तर या छापेमारीत PFI कार्यालयामधून १५० मोबाईल आणि ५० लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे. तर दिल्लीत अटक केलेला PFI नेता आणि कार्यकर्त्यांना कोर्टात लगेच हजर करण्यात आलं आणि पटियाला हाऊस कोर्टाने त्यांना २६ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार संपूर्ण ऑपरेशन गृहमंत्री अमित शहा, NSA अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली झालं आहे आणि त्यांनीच संपूर्ण प्लॅनिंग ही केलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे