स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत महत्वपूर्ण ठिकाणी कलम १४४ लागू

नवी दिल्ली, १० ऑगस्ट २०२३ : स्वातंत्र्य दिन पुढील आठवड्यात साजरा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत महत्वाच्या ठिकाणी म्हणजे राजघाट, आयटीओ आणि लाल किल्ल्यासह इतर महत्वपूर्ण ठिकाणी दिल्ली पोलिसांनी जमावबंदीचे कलम १४४ लागू केले आहे.

१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार असून या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकविणार आहेत. दरम्यान १६ ऑगस्टपर्यंत हवेत उडणारे पॅराग्लायडर, हँड ग्लायडर, हाॅट एअर बलून आणि मानवरहित एरियल व्हेईकल उडविण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

या आदेशांचे पालन आजपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार या सर्व ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गाड्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा