सुरक्षा दलांनी कुलगाम चकमकीत ३ दहशतवादी केले ठार, 2 सैनिक जखमी

जम्मू-काश्मीर, १ जुलै २०२१: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार झालाय. या चकमकीत सुरक्षा दलांनी एकूण ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. दोन जवानही जखमी झाले आहेत.

कुलगामच्या चिमर भागात बुधवारी संध्याकाळी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमधील चकमकी अनेक तास सुरू राहिली. चकमकीच्या सुरूवातीस २ दहशतवादी ठार झाले, नंतर सुरक्षा दलानं आणखी एका दहशतवाद्याला ठार केले.
चिमर परिसरात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. या चकमकीत २ जवानही जखमी झाले आहेत.

परमिपोरामध्ये २ दहशतवादी ठार

यापूर्वी मंगळवारी श्रीनगरमधील परिमपोरा येथे सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. सोमवारपासून परिमपोरा भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी लष्कर कमांडर अबरारसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते ते घर सुरक्षा दलाने उडवलं. दहशतवाद्यांकडून दोन एके ४७ रायफल जप्त करण्यात आल्या आहेत.
सोमवारी महामार्गावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांविषयी माहिती मिळाली होती.

इनपुटचे गांभीर्य लक्षात घेऊन जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकानं नाकाबंदी केली. दरम्यान, परिमपोरा नाका येथे वाहन थांबविण्यात आलं आणि त्यांची ओळख विचारण्यात आली. मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने आपली बॅग उघडण्याचा प्रयत्न केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा