सुपे येथील ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीची अजित पवार यांच्याकडून पहाणी

सुपे (बारामती), दि. २२ जून २०२० : बारामती तालुक्यातील सुपे येथे सुमारे ६ कोटी रुपये खर्च करुन नव्याने बांधकाम होत असलेल्या ग्रामीण रुग्णालयाची पहाणी राज्याचे उपमुख्यमंत्री
अजित पवार केली.

तालुक्यातील विविध विकास कामांचा पहाणी दौरा पवार यांनी केला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सुपे रुग्णालयात सकाळी सकाळी पाऊणे सात वाजता
भेट दिल्याने अधिकारी व ठेकेदार यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांच्या कामाच्या झपाट्याचा अनुभव प्रत्यक्ष ग्रामस्थांसह ठेकेदारांनाही अनुभवता आला.
पवार यांनी प्रथम सुप्याच्या पुर्वेकडे नव्याने होत असलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या इमारत बांधकामाची पहाणी केली. त्यानंतर ते खैरेपडळ रस्त्यावर बाजार समितीच्यावतीने होत असलेल्या भाजी मंडईच्या जागेची पहाणी लोकांच्या गर्दीमुळे दुरुनच केली. तर बाजार समितीचा नव्याने होत असलेल्या
पेट्रोल पंपाची पहाणी गर्दीमुळे टाळली.

त्यानंतर पवार यांच्या गाड्यांचा ताफा सुपे ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाकडे वळला. सुप्याच्या वैभवात भर
घालणारी सुसज्ज अशी रुग्णालयाची इमारत होणार आहे. त्यामुळे पवार यांनी प्रत्यक्ष या बांधकामाची बारकाईने पहाणी केली. सध्या येथील रुग्णालयाची इमारत सुमारे ६ ते ७ हजार स्क्वेअर फुटाची असून ३० बेडची व्यवस्था होणार आहे. त्यामुळे भविष्यात ती १०० बेडची करता येईल का ? याविषयी पवार यांनी माहिती घेतली. तसेच ही जागा खड्यात असल्याने जोथा उचलून उंच इमारत कशी करता येईल याबाबत ठेकेदारांसोबत चर्चा केली.

यावेळी या इमारतीचे आर्किटेक कृष्णकुमार बांगड म्हणाले की सध्सा इतर कुठेही असे ग्रामीण रुग्णालय नाही अशी हि ग्रीन इमारत तयार होत आहे. या इमारतीच्या पार्किंगसाठी
१० हजार स्क्वेअर फुट जागा आहे. त्यामुळे भविष्यात येथे कोणतेही लसीकरण

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा