कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामय्या, डी के शिवकुमार उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का याकडे नजरा

बंगळुरू,१७ मे २०२३ : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा तिढा अखेर सुटला आहे. गेल्या चार ते पाच दिवसाच्या घडामोडीनंतर अखेर कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सिद्धारमैया यांच्या गळ्यात पडली आहे. तर राज्यात काँग्रेसच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का याकडे नजर लागल्या आहेत.

गेल्या चार ते पाच दिवसाच्या घामासानात बैठकांवर बैठकांची सत्र पार पडूली.आज अखेर कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सिद्धारमैया यांच्या गळ्यात पडली आहे. तर डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली आहे. सिद्धारमैया हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या पूर्वीही काम पाहिले आहे. तसेच प्रशासनावर त्यांची मजबूत पकड, ही त्यांची जमेची बाजू आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची उद्या १८ मे रोजी शपथ घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धारमैया उद्या १८ मे रोजी दुपारी ३:३० वाजता पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. त्यामुळे शपथविधी सोहळ्याची तयारी करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदासह महत्त्वाची खाती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या बंगळुरूमध्ये विधिमंडळ दलाची बैठक होईल. त्यावेळी पुढील रणनीतीवरही चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सिद्धरामय्या यांनी यापूर्वीही मुख्यमंत्री पद भूषवले आहे. त्यामुळे मला मुख्यमंत्री पदाची पहिली संधी देण्यात यावी. अन्यथा मी एक सामान्य आमदार म्हणून कार्यरत राहील. अशी भूमिका डिके शिवकुमार यांनी घेतली होती. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले होते. आता डीके शिवकुमार काय भूमिका घेतात हे मात्र गुल्लस्त्यात असल्याचे दिसून येते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा