राम मंदिर भूमीपुजन कार्यक्रमाचे पहिले निमंत्रण हिंदूला न मिळाता कोणाला मिळाले पाहा……

आयोध्या, ४ ऑगस्ट २०२० : ५ ऑगस्ट रोजी आयोध्येत होण्या-या राम मंदिर भूमीपुजन कार्यक्रमाची तयारी जोरदार चालू असून, त्या दिवशी भारताने घरीच राहून दिवाळी दसरा साजरा करा असे वक्तव्य होत आहे. त्या बरोबरच संपुर्ण भारतात राममंदिर भूमीपुजनावरुन एकच आनंद साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर होण्या-या या सोहळ्याला मोजक्याच लोकांची उपस्थिती होणार राहणार आहे. तसेच राममंदिर हे हिंदू धर्माचा धार्मिक स्तंभ असला तरी राममंदिर बांधकाम सुरु होण्या-या निर्णयावर अनेक मुस्लिम बांधव देखील समर्थन करताना दिसत आहेत.

पहिले निमंत्रण मुस्लिम पक्षकराला…..

राम मंदिर भूमीपुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून मोजक्याच लोकांना आमंत्रण पत्रिका ही पोहचविण्यात येत आहे. भाजपचे जेष्ठ नेते आणि राम मंदिर आंदोलनाचे आघाडीचे व्यक्ती लाल कृष्ण आडवाणी यांना जरी या मधून वगळण्यात आले असले तरी, पहिली आमंत्रण पत्रिका हि मुस्लिम पक्षकाराला देण्यात आली आहे. हे ते पक्षकार आहेत ज्यांनी बाबरी मशिदीच्या बाजूचे लढा दिला होतो. इक्बाल अंसारी आणि हाजी महबूब अशी त्यांची नावे असून त्यांना ही पत्रिका पाठविण्यात आली आहे.

तसेच बेवारस मृतदेहांवर अंतविधी करणारे पद्मश्री मुहम्मद शरीफ यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. तर इक्बाल अंसारी यांनी माझ्या मनात प्रभू रामचंद्रा बद्द्ल खुप आदर आहे त्यामुळे मी नक्की जाणार अशी भावना व्यक्त केली.

विरोधी नेत्याकडून टिकासत्र…..

तर काही विरोधी नेते हे या कोरोना काळात राम मंदिर भूमीपुजन कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित करत आहेत. त्या बरोबरच या भूमीपुजनाच्या कार्यक्रमांची कडी हि बिहार निवडणुकी बरोबर देखील जोडली जात आहे. तर कोरोनावरुन लोकांचे लक्ष हटवण्यासाठी आणि आपले कोरोना परिस्थितीचे अपयश लपवण्यासाठी हा कार्यक्रम करत असल्याचा आरोप विरोधी नेत्यांकडून होताना दिसत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा