गोल पोस्ट महाराष्ट्र ज्योत्स्ना मुळीकची तहसीलदार पदी निवड

ज्योत्स्ना मुळीकची तहसीलदार पदी निवड

सोलापूर, दि. २१ जून २०२०: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कै विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालयाच्या ज्योत्स्ना प्रकाश मुळीकची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ६३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन तहसीलदार पदी निवड झाली आहे.

ज्योत्स्ना मुळीक ही इतिहास विषयातून बी.ए. झालेली असून दहावी नतंर पाँलिटेक्निक करूनही जाणीवपूर्वक तिने बी.ए ला प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती.

सलग तीन वर्षे तिने महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. तीन वर्षांच्या परिश्रमानंतर तिने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ज्योत्स्ना मुळीक कै. विठ्ठलराव शिंदे , टेंभुर्णी येथील महाविद्यालयातील प्रा. रवींद्र कुनाळे यांची मेहुणी असून, या यशाबद्दल आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, जि. प.सदस्य रणजितसिंह शिंदे, संस्थेचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे
यांनी अभिनंदन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version