माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये निवड

माळेगाव, दि. ९सप्टेंबर २०२०: शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित महाविद्यालय असून, यंदा चालू शैक्षणिक वर्षांमध्ये पुणे जिल्हा ग्रामीण भागामधील सर्वाधिक प्लेसमेंट देणारे महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवला आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नवनवीन क्रियाशील उपक्रम राबवण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असते. याचाच परिपाक म्हणून महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची ऑटोमेशन क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या फ्लॅश इलेक्ट्रॉनीक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम. मुकणे यांनी दिली आहे.

माळेगाव अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या निवडीची प्रक्रिया टेक्निकल इंटरव्ह्य़ू व पर्सनल इंटरव्ह्यू या दोन स्तरांवर मूल्यांकन करून संपन्न झाली. या निवड प्रक्रियेत एकूण पाच विद्यार्थ्यां यशस्वी झाले. महाविद्यालयातील अभिजीत कांबळे, अभिजीत मांडे, प्रणील गायकवाड, आकाश मोहिते व सुयोग गायकवाड या विद्यार्थ्यांच्या निवडीमध्ये समावेश झाला. सर्व क्षेत्रात यशस्वी असणारे उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयाचा लौकिक आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच रोजगारक्षम बनवणारे कौशल्य विकसित करण्यासाठी माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर आधारित कार्यशाळांचे तसेच विविध वेबिनार मालिकांचे महाविद्यालयामार्फत आयोजन करण्यात येत आहे. चालू शैक्षणिक वर्षांमध्ये आतापर्यंत २४७ विद्यार्थ्यांची विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झालेली आहे व ही निवडीची प्रक्रिया अजूनही सुरूच असल्याची माहिती महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी डॉ. माधव राउळ यांनी दिली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब तावरे, विश्वस्त वसंतराव तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, रवींद्र थोरात व सचिव प्रमोद शिंदे यांनी अभिनंदन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा