गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा माळी सेवा संघाच्या संपर्क प्रमुख पदी शंभूराजे फुगे यांची निवड

माळी सेवा संघाच्या संपर्क प्रमुख पदी शंभूराजे फुगे यांची निवड

पिंपळनेर (सोलापूर), दि. ९ जुलै २०२०: पिंपळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते शंभूराजे फुगे यांची माळी सेवा संघाच्या माढा तालुका संपर्क प्रमुख पदी नुकतीच निवड करण्यात आली. माळी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय माळी व युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश राऊत यांनी शंभुराजे फुगे यांना नियुक्तीचे पत्र दिले.

सामाजिक क्षेत्रातील आवड तसेच माळी समाजाच्या सेवेबद्दलची ओढ लक्षात घेऊन शंभूराजे फुगे यांची समाजकार्यासाठी व समाज संघटन करण्यासाठी माळी सेवा संघाच्या माढा तालुका संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे नियुक्ती पत्रात नमुद करण्यात आले आहे.

या निवडीबद्दल सर्व स्तरातून शंभूराजे फुगे यांचे अभिनंदन होत आहे. तालुका संपर्क प्रमुख पदावर निवड झाल्याने खूप मोठी जबाबदारी वाढली असून समाजाचे संघटन करण्यासाठी तसेच समाजबांधवांच्या समस्या, अडचणी सोडविण्यासाठी माळी सेवा संघाच्या माध्यमातून कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे निवडीनंतर शंभूराजे फुगे यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version