स्व. ॲड. अशोकराव शिंदे यांना मरणोत्तर विधी गौरव पुरस्कार

भोकरदन, १२ जानेवारी २०२४ : येथील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ स्वर्गीय ॲड. अशोकराव शिंदे यांना मरणोत्तर विधी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी न्यायालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात सदर पुरस्कार ॲड. अशोकराव शिंदे यांच्या मुलाने म्हणजेच ॲड. राहुल शिंदे यांनी विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांच्या हस्ते स्वीकारला आहे.

भोकरदन येथे १० जानेवारी रोजी वकील संघ आयोजित विधी गौरव पुरस्कार सोहळा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती वर्षा मोहिते या उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ॲड. पारिजात पांडे, भोकरदन येथील दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर. व्ही. पाटील, सहदिवाणी न्यायाधीश सी. एस. देशपांडे, ॲड. व्ही. डी. साळुंके, ॲड. बाबासाहेब इंगळे आदींची उपस्थिती होती.

यावेळी प्रथम मान्यवरांचे वकील संघाचे अध्यक्ष संजय गाढे सह. ॲड. पद्माकर खरात, संदीप दारुवाले, ॲड. के. एम. शाह यांच्यासह इतर वकील बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथींच्या मार्गदर्शनानंतर विधी गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात स्वर्गीय ॲड. अशोकराव शिंदे यांना विधी क्षेत्रातील प्रदीर्घ सेवा व योगदानाबद्दल मरणोत्तर विधी गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला व तो पुरस्कार त्यांचा मुलगा प्रसिद्ध वकील ॲड. राहुल अशोकराव शिंदे यांनी स्वीकारला. शिवाय ॲड. सपकाळ, ॲड. कुलकर्णी, ॲड. तळेकर, ॲड. देशपांडे, ॲड. थारेवाल, ॲड. नवाब, ॲड. जाधव यांना देखील विधी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा