गोल पोस्ट महाराष्ट्र अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याकरिता प्रस्ताव केंद्राकडे पाठवा -आमदार यशवंत माने

अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याकरिता प्रस्ताव केंद्राकडे पाठवा -आमदार यशवंत माने

इंदापूर, दि. २६ जुलै २०२०: महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे आहे, यावर्षी अण्णाभाऊ साठे यांचे २०२० हे जन्मशताब्दी वर्ष असून अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रातील नाव व कार्य पाहता महाराष्ट्र शासनाकडून भारतरत्न पुरस्काराची शिफारस होणे आवश्यक आहे.

याकरिता विधानसभा व विधान परिषद सभागृहात ठराव होणे महत्त्वाचे असते. परंतु, कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामुळे हे शक्य नाही म्हणून प्रस्ताव तयार करणे आवश्यक आहे. साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा यासाठी यावर्षी शासनाने प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठवावा अशी मागणी माझ्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून होत आहे.

तरी शासनाने त्वरित अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भातील भारतरत्न पुरस्कारासाठी चा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा अशी मागणी मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री यांना पाठवली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version