काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार भंवरलाल शर्मा यांचे निधन

जयपूर, ९ ऑक्टोबर २०२२: राजस्थान येथील काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार भंवरलाल शर्मा यांचे रविवारी सकाळी वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. शनिवारी दुपारी त्यांना एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भंवरलाल शर्मा यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार भंवरलाल शर्मा यांना शनिवारी सकाळी एसएमएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. न्यूमोनिया, किडनी संसर्ग यासह अनेक विकारांवर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती सतत खालावत गेली आणि उपचारादरम्यान हॉस्पिटलच्या वैद्यकीय आयसीयूमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राहुल गांधींवर केली होती टीका

भंवरलाल शर्मा सरदार शहरमधून ७ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. दरम्यान, भंवरलाल शर्मा हे मे २०१४ मध्ये राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रीय मीडियासाठी प्रसिद्ध चेहरा बनले होते. काँग्रेसचे आमदार भंवरलाल शर्मा यांनी राहुल गांधी आणि त्यांच्या सल्लागारांना विदूषक म्हटले होते. ते म्हणाले होते की, गांधी घराण्यातील सदस्य असल्याने राहुल यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. अन्यथा त्यांना अनुभव नाही. यानंतर काँग्रेसने राहुल गांधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भंवरलाल शर्मा यांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र, कालांतराने ते पुन्हा पक्षात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा