ज्येष्ठ नेते गुरूलिंग बापू खटके यांचे निधन. आधारवड हरपल्याची भावना

माढा, २६ ऑगस्ट २०२०: माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक,तांबवे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन, माढा तालुक्यातील ज्येष्ठ नेते गुरूलिंग बापू खटके यांचे अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान आज सकाळी वयाच्या ७६ वर्षी निधन झाले. वृध्दापकाळामुळे गेली काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. सोमवारी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मनाने दिलदार, सुखदुःखात पंचक्रोशीतील लोकांना वेळ काढून कायम मदत करणारे बापू,तांबवे विविध विकास कार्यकारी सोसायटीचे २० वर्षे चेअरमन होते. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अरण भुषण समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राजकारण, समाजकारण, सहकार या तिन्ही क्षेत्रात बापूंनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

त्यांच्या निधनाने आधारवड गेल्याची भावना राजकिय व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त होत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले,मुलगी, सुना,नातंवडे असा परिवार आहे.माजी सरपंच उद्धव खटके यांचे ते भाऊ व सोलापुर जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रथमेश खटके यांचे आजोबा होत.त्यांच्या दु:खद निधनाबद्दल आमदार बबनदादा शिंदे यांनी शोक व्यक्त केला.

आदरणीय बापूंनी राजकारण, समाजकारण, सहकाराच्या माध्यमातून लोकहिताचे काम केले, बापू गावचे आधारवड होते,त्यांच्या निधनाने तांबवे गावची मोठी हानी झाल्याची भावना गावचे माजी सरपंच राजाभाऊ खटके, उपसरपंच नागेशबापू खटके, तंटामुक्ती अध्यक्ष नागनाथ भाऊ खटके, यश उद्योग समुहाचे गोरख खटके, सोसायटी चेअरमन भजनदास खटके, माजी चेअरमन संतोष बापू खटके, ग्रा.पं.सदस्य दिपक खटके यांनी व्यक्त केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील.

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा