गोल पोस्ट महाराष्ट्र संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन

संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन

पुणे, २७ सप्टेंबर २०२२: संतसाहित्याचे आणि लोक वाङमयाचे गाढे अभ्यासक व ज्येष्ठ भारुडकार डॉ. रामचंद्र अनंत देखणे वय वर्ष ६६ यांचे सोमवारी रात्री ह्रदयविकाराने निधन झाले आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि एक मुलगी असा परीवार आहे.

काल घटस्थापनेमुळे डॉ.रामचंद्र देखणे हे शनिवार पेठेतील आपल्या घरीच होते. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी ताबडतोप त्यांना खाजगी रुग्णालयात नेले. परंतु, त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते नियमित व्यायाम करत असत.

डॉ. देखणे हे पिंपरी चिंचवड नगर प्राधिकरणाच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते. त्यांच्या घरी वारकरी संप्रदायाची पंरपरा आहे. वडीलांच्या कीर्तनात ते लहानपणी टाळकरी म्हणून उभे राहत आणि खड्या आवाजात अभंगातील चरणे म्हणत. त्यामुळे ते आपोआप कीर्तन, भजन, प्रवचण आणि भारुड या कलाशी जोडले गेले होते.

त्यांनी गेल्या काही वर्षात विविध विषयांवरती अनेक व्याख्याने दिली आहेत. त्यांना पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळाली आहे. त्यांच्या अशा जाण्याने साहित्य शेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version