गोल पोस्ट महाराष्ट्र अहमदनगरमध्ये खळबळजनक घटना, जिल्यात मोठा शस्त्रसाठा जप्त

अहमदनगरमध्ये खळबळजनक घटना, जिल्यात मोठा शस्त्रसाठा जप्त

अहमदनगर, २२ जुलै २०२३ : अहमदनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील खरे कर्जुले गावातून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. ज्यामध्ये १२ बाँम्ब, २५ किलो दारुगोळा आणि २५ पिस्तूल राउंडचा समावेश आहे. शस्त्रसाठ्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. या छाप्यांमध्ये मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला आहे.

गावात एकाच्या घरात बाँम्ब आणि दारुगोळा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी गावात जाऊन छापा टाकला असता २५ किलो दारुगोळा, १२ बाँम्ब आणि २५ पिस्तूल राउंड आढळून आले आहेत. या प्रकरणात स्फोटक साहित्य आणि शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी दिनकर शेळके याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अवैध पद्धतीने शस्त्रसाठा करण्यात आला होता, यामुळे मोठी दुर्घटना देखील घडू शकली असती.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version