नवी दिल्ली, ३ जून २०२३: दिल्ली सचिवालयातून संवेदनशील प्रकरणांच्या फाईली गहाळ झाल्याप्रकरणी दिल्ली सरकारमधील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष सचिव वाय.वी.वी जे राजशेखर यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाचे नूतनीकरण, अबकारी धोरणातील तपासासह अनेक संवेदनशील प्रकरणातील तपासाशी संबंधी सतर्कता विभागाच्या फाईली अनाधिकृतरित्या हटवण्यात आल्याचा दावा करीत तक्रार दाखल केली होती.
पोलीस दलाने गुन्हा दाखल करीत कारवाई सुरू केली आहे. १६ मे च्या मध्यरात्री तीनच्या सुमारास सचिवांच्या कार्यालयात अनधिकृतरित्या प्रवेश करीत गोपनीय कागदपत्रे हटवण्यात आल्याचा दावा तक्रारीतून करण्यात आला होत. अनेक उच्च पदस्थ व्यक्ती तसेच अधिकाऱ्यांविरोधा सुरू असलेल्या तपासासंबंधी ही कागदपत्रे होती. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गहाळ झालेल्या कागदपत्रांमध्ये आबकारी विभागांचे आरोपपत्र, मुख्यमंत्री संबंधी दस्तऐवज, मुख्यमंत्री निवासस्थानाचे नूतनीकरण, सूचना तसेच प्रचारासाठी देण्यात आलेला निधी, दिल्ली जल बोर्डाच्या संबंधी प्रकरणे, व्यापार व कर विभागातील सोने चोरी प्रकणासह तुरंगाधिकारी व मंत्र्यांच्या फाईली गहाळ झाल्या आहेत. दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांच्या सांगण्यावरून या फाईली गहाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर