ईडीने ताब्यात घेतल्यानंतर सेंथिल बालाजी यांची तब्येत बिघडली, डीएमके काँग्रेसकडून निषेध

चेन्नई, तामिळनाडू १४ जून २०२३: तमिळनाडूचे ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांना एका मनी लॉड्रिंग केसमध्ये ईडीने काल रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्यानंतर बालाजी यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना चेन्नईच्या सरकारी रुग्णालयात आज सकाळी आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. या कारवाईवरुन डीएमके, काँग्रेससह अन्य पक्षांनी भाजपचा आणि केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

डीएमकेच्या नेत्यांनी आरोप केला आहे की, ईडीने छापेमारी केल्यानंतर, बालाजी यांनी आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली होती. तसेच राज्यमंत्री पीके सेकर बाबू यांनी बालाजी यांची अवस्था पाहून, त्यांना टॉर्चर करण्यात आले असा आरोप केला आहे. काही रिपोर्टच्या अनूसार बालाजी यांना ईडीने अटक केल्याची माहिती आहे.

पी सेकर बाबू माध्यामांशी बोलताना म्हणाले, ऊर्जामंत्र्यांना आता आयसीयू मध्ये ठेवण्यात आले आहे. ते बेशुद्ध आहेत आणि त्यांचे नाव पुकारल्यावरही ते प्रतिसाद देत नाहीत. त्यांच्या कानाजवळ सूज आहे. ईसीजीमध्येही बरेच चढ-उतार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा