युके, १० डिसेंबर २०२०: जग आत्ता कुठं कोरोना व्हायरस संपण्याचं स्वप्न पाहत होतं आणि ते पाहण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं ही लसीचं विधान करून नागरिकांमधे सकारात्मकता जागरूक केली होती. पण, आता लसीचे असे काही परिणाम बाहेर आले आहेत ज्यामुळं कोरोना लसी बद्दल लोकांमधे भितीचं वातावरण निर्माण होऊ शकतं.
कोरोना वर लसीकरण करणारा युके हा पहिला देश ठरला खरा, मात्र आता त्याचे भयंकर परिणाम समोर येऊ लागले आहेत. युके मधे लसीच्या आपत्कालीन परिस्थिती साठी फायझरची लस सर्वांना दिली जात आहे. पण, २४ तासाच्या आतच कोरोना लस दिलेल्या नागरिकांना गंभीर संसर्ग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
ब्रिटनमध्ये आरोग्य कर्मचारी आणि वयस्कर व्यक्तींना सर्वात आधी लस दिली जाते आहे. लस घेताच चर्चेत आसणारी वयोवृद्ध ९० वर्षीय महिला आणि दुसरे वयोवृद्ध पुरूष या दोघांवर लशीचा दुष्परिणाम दिसून आला आहे. लशीकरणा नंतर त्यांना ॲलर्जी झाली आसून, हे दोघंही आरोग्य कर्मचारी आहेत. दोघांनाही अॅनाफिलेक्टॉइड रियाक्शन झाले आहे.ज्यामध्ये रॅश, श्वास घ्यायला त्रास, चेहरा आणि जिभेला सूज, रक्तदाब कमी होणं अशी लक्षणं दिसून आली आहे.
लस बाजारात आणण्याची सध्या ही स्पर्धा तर नाही ना असे प्रश्न आधीच उभे राहत आहेत. तर लसीबाबत अनेक तज्ञांनी इशारा देखील दिला होता. तसेच बाजारात नकली लस विकणारे तग धरून बसलेत हे ही सांगण्यात आले होते. तसेच अनेक देश सध्या या लसीच्या स्पर्धेत आहेत. मात्र, हि स्पर्धा मानवी संरक्षणासाठी जितकी महत्त्वाची मानली जात आहे. ती या व्यापार आणि स्पर्धेमुळं मानवी जीवनात घातक ठरणारी नको हि काळजी सर्व कंपन्यांना घेणं गरजेचं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव