सिरम इन्स्टिट्यूट ने फेटाळला ७३ दिवसांचा दावा…

पुणे, २३ ऑगस्ट २०२०: भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे, असे असले तरी हि भारतामध्ये सध्या ३ लस वर काम सुरू आहे. त्यातल्या त्यात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट सर्वात आधी लस आणण्याचा दावा केला होता. यावरून माध्यमांमध्ये असे सांगितले जात होते की, येत्या ७३ दिवसांमध्ये सिरम इन्स्टिट्यूटने आपली लस बाजारात आणेल. परंतु सिरम इन्स्टिट्यूटने याबाबत खुलासा करत असे म्हटले आहे की, माध्यमांवर फिरत असलेला हे वक्तव्य साफ खोटा आहे.

सध्या सिरम इन्स्टिट्यूटने ही लस लवकरात लवकर बाजारामध्ये आणण्यासाठी याच्या चाचण्या घेत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सिरम इन्स्टिट्यूटचं नाव चांगलेच चर्चेत राहिलं होतं. माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या दाखवले जात असल्याचं सांगत असे म्हटले आहे की, कोविशिल्ड’च्या उपलब्धतेविषयी माध्यमांमध्ये सध्या जे दावे केले जात आहेत, ते पुर्णपणे खोटे व अंदाजावर आधारित आहेत. सध्या केंद्र सरकारनं आम्हाला फक्त लस तयार करण्याची परवानगी आणि भविष्यातील वापरासाठी ती साठवून ठेवण्याची परवानगी दिली आहे.

कंपनीने स्पष्टपणे सांगितले की, कॉव्हिसिल्ड केवळ चाचण्यांमध्ये यशस्वी होईल आणि त्यानंतर नियामक मान्यता मिळेल तेव्हाच त्याचे व्यापारीकरण केले जाईल. ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसची फेज ३ चाचणी चालू आहे. कंपनीने म्हटले आहे की, एकदा ही लस रोगप्रतिरोधक वर प्रभावी सिद्ध झाल्यावर ती त्याच्या उपलब्धतेची पुष्टी करेल. कंपनीची लस फक्त डॉलर ३ (जवळपास २२५ रुपये) या दरांमध्ये मध्यम श्रेणीमध्ये येणाऱ्या देशांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा