सीरमचा एस्ट्राजेनेका सोबत लसच्या १० कोटी डोस साठी भागीदारी

नवी दिल्ली, २४ नोव्हेंबर २०२०: सीरम संस्थेनं ऑक्सफोर्ड विद्यापीठाशी भारतातील कोरोना लससाठी करार केला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (सीआयआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं की, लसच्या १० कोटी डोस साठी अ‍ॅस्ट्रॅजेनेकाबरोबर भागीदारी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत चाचणीची तिसरी फेरी यशस्वी झाल्यानंतर लसला ब्रिटनमधील ड्रग रेगुलेटर कडून तातडीनं मान्यता मिळाल्यास लवकरच ही लस भारतात उपलब्ध होऊ शकंल. पूनावाला यांचा असा विश्वास आहे की कोविशिल्टचे किमान १०० मिलियन डोस जानेवारीपर्यंत उपलब्ध होतील.

फेब्रुवारी अखेर शेकडो मिलियन डोस तयार होतील

सीआयआयचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितलं की, फेब्रुवारीअखेरीस या लसीचे शेकडो मिलियन डोस तयार करता येतील. ही कोरोना लस ९० टक्क्यांपर्यंत चाचणीमध्ये प्रभावी ठरली ही फार आनंदाची बाब आहे. लवकरच ही लस सर्वांसाठी सर्वत्र उपलब्ध होईल. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका या लस, ज्या लस सीरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्यानं तयार केल्या जात आहेत त्या कोरोना संसर्गापासून ७० टक्क्यांपर्यंत संरक्षण देण्यात प्रभावी ठरल्या आहेत. तिसर्‍या टप्प्यातील चाचणीनंतर सोमवारी याची घोषणा करण्यात आली.

कोरोना विरूद्धच्या लढ्यात महत्त्वपूर्ण टप्पा पार

सोमवारी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं म्हटलं आहे की, आज आम्ही कोरोनाविरूद्धच्या लढ्यात मैलाचा दगड पार केला आहे. जर दोन प्रकारचे डोज रेजीमेन एकत्र केले तर तिसर्‍या टप्प्यातील अंतरिम डेटा दर्शविते की लस ७०.४ टक्के पर्यंत प्रभावी आहे.

लस हजारो लोकांचे जीव वाचवू शकते

ऑक्सफोर्ड लस समूहाचे संचालक आणि चाचणी प्रमुख एंड्रयू पोलार्ड यांच्या मते, “यूके आणि ब्राझीलमधील लसीच्या निकालांमुळं ही लस हजारो लोकांचे प्राण वाचवू शकंल अशी आशा निर्माण झाली आहे.” त्यांनी सांगितलं की डोसच्या चार पॅटर्नमध्ये जर एकामध्ये लसचा पहिला डोस अर्धा दिल्यास आणि दुसरा डोस पूर्ण झाल्यास त्याचा परिणाम ९० टक्क्यांपर्यंत होऊ शकतो. अस्ट्राझेनेका यांनी जागतिक आरोग्य संघटनेला विनंती केली आहे की कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये या लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात यावी.

२० हजाराहून अधिक स्वयंसेवकांवर ट्रायल

चाचणीत वीस हजाराहून अधिक स्वयंसेवक होते. त्यातील निम्मे लोक ब्रिटनचे आणि अर्धे ब्राझीलचे होते. चाचणी दरम्यान असं दिसून आलं की जेव्हा स्वयंसेवकांना दोन उच्च डोस दिले जातात तेव्हा ते ६२ टक्के प्रभावी होते. तथापि, जेव्हा कमी डोस दिला जातो तेव्हा तो ९० टक्क्यांपर्यंत प्रभावी होता. हा फरक का आहे हे अद्याप समजू शकलं नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा