आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत ‘न्यू इंग्लिश स्कुल’चे सातजन शिष्यवृत्तीस पात्र

5

माढा, २५ नोव्हेंबर २०२०: रयत शिक्षण संस्थेच्या टेंभुर्णी येथील न्यू इंग्लिश स्कूलचे सात विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यांनी घवघवीत यश मिळविल्यानं त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे.

इ.आठवीतील २७ विदयार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले असून सातजण शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत ते असे साक्षी अमर देशमुख, विपुल विजय माने, मधुरा रत्नदीप भास्करे, साक्षी हरिष देशमुख, मृगनयनी सुखदेव कांबळे, मुकुंद विभास लोंढे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. तर पाचवी मधील २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, ते शिष्यवृत्तीस पात्र झाले नाहीत.

इ.८वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विभागप्रमुख-एम.आय. पवार, जी.एन. अवघडे, ए.बी. सुतार, ए.बी.जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.तर इ.५ वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख आर.एस.उबाळे, पी.बी.मोरे,ए.आर. डायरे, आर.बी. खंडागळे, आर.आर खंडागळे यांचं मार्गदर्शन लाभलं.

यशस्वी विद्यार्थी व सर्व मार्गदर्शक शिक्षकांचं स्कूल कमिटी सदस्य परमेश्वर देशमुख, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष-वसंत येवले-पाटील, जनरल बॉडी सदस्य बाळासाहेब पाटील, मुख्याध्यापक डी. टी. गोंजारी, पर्यवेक्षक एम. एस. भुजबळ तसेच सर्व पालक यांनी अभिनंदन केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा