कारने बैलगाडीला दिलेल्या धडकेत सातजण जखमी, एका बैलाचा जागीच मृत्यू

पुणे, १९ जानेवारी २०२३ : मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना माणिकखांबजवळ कारने बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सातजण जखमी, एका बैलाचा जागीच मृत्यू झाला.

धडक दिल्यानंतर कार उलटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात बैलगाडीमधील तीन ते चारजण व कारमधील तीनजण जखमी झाले आहेत. एका बैलाचा यात मृत्यू झाला असून, बैलगाडीचा चक्काचूर झाला आहे.

मदतीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सर्व जखमींना वाहतूक पोलिसांनी ‘रूट पेट्रोलिंग टीम’चे दीपक मावरिया, विजय कुंडगर, सूरज आव्हाड, रवी दुर्गुडे यांच्या मदतीने ‘घोटी टोल प्लाझा’च्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महिंद्रा कंपनीतील अधिकारी जयंत इंगळे, सुरक्षा अधिकारी हरीश चौबे, मनोज भडांगे, ए. डी. सोनवणे यांनीही मदतकार्य केले. महामार्ग पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांनी आपल्या पथकासह वाहतूक सुरळीत केली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा