गोल पोस्ट महाराष्ट्र मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या सात दुकानांवर धाडी; सहा क्विंटल प्लॅस्टिक जप्त

मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या सात दुकानांवर धाडी; सहा क्विंटल प्लॅस्टिक जप्त

नांदेड, २१ फेब्रुवारी २०२४ : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका पथकाने जुनामोढा भागांतील दुकानांवर आज धाड टाकली. त्यात त्यांनी एकूण सात क्विंटल प्लॅस्टिक जप्त केले. ज्यात प्लॅस्टिक द्रोण, ग्लास ,चमचे, पतरवाळी, वाटी, कँरीबँग इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. यातील काही दुकानांवर यापूर्वी सुद्धा धाडी टाकून प्लास्टिक जप्त करण्यात आले होते. पण या दुकानदारांनी प्लास्टिक विकणे बंद न केल्यामुळे आज पुन्हा या दुकानदारांवर धाडी टाकून प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : गौतम कांबळे

error: Content is protected !!
Exit mobile version