पिंपरी चिंचवड, ११ जानेवारी २०२१: नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, महानगरपालिका उपायुक्त मनोज घोडे-पाटील उपस्थित होते.
नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याची ग्वाही यावेळेस दिली. सातवा वेतन आयोगातील तांत्रिक अडचणी दूर करुन लवकरात लवकर नाशिक महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना आयोग लागू करण्यात येईल.
पिंपरी चिंचवड येथील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाचा अभ्यास करुन नाशिक येथील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सातवा वेतन आयोग हा शासकीय वेतनश्रेणीनुसार लागू होणार आहे. वेतन आयोग लागू होतांना कर्मचाऱ्यांचे वेतन संरक्षित केले जाणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी बैठकित दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे