कर्जत मध्ये युरिया खतांची तीव्र टंचाई

कर्जत, दि. १४ जुलै २०२०: कर्जत तालुक्यातील काही भाग हा बागायत पट्टा आहे तर काही भाग हा जिरायत भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी युरिया खताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी वर्गाचे युरिया न मिळाल्याने प्रचंड हाल होत आहे. दुकानात खत आले हे समजताच शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणावर पहाटे पासूनच गर्दी पाहण्यास मिळत आहे.

काल दिनांक १३ रोजी खत आल्याचे समजताच जगाचा पोशिंदा शेतकरी हा त्या ठिकाणी पहाटे पासूनच रांग लावून उभा असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रत्येक शेतक-यांना दोन गोणी युरिया खत मिळत आहे. या वर्षी चांगला पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गाची पिके देखील चांगल्या प्रकारे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खतं घेण्यासाठी झुंबड उडत आहे.

पिकांना युरिया खतामुळे वाढी आणि ताजगी येते आणि पिके हि आजूनही चांगली येतात. युरिया हे खत मिळावे म्हणून तालुक्यातील शेतकरी हा त्या ठिकाणी पहाटे पासूनच रांग लावून उभा असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा