गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा फलटण- सातारा रस्त्यावर सांडले मळीमिश्रीत पाणी ; दुचाकी वाहने घसरली

फलटण- सातारा रस्त्यावर सांडले मळीमिश्रीत पाणी ; दुचाकी वाहने घसरली

सातारा, दि.११मे २०२०: फलटण-सातारा रस्त्यावरून टँकर जात असताना टँकरचा वॉल सुरू राहिल्याने पाणीयुक्त मळी डांबरावर सांडून रस्ता निसरडा झाला. त्यामुळे या रस्त्यावरुन जाणारे प्रवाशी वाहन चालकांच्या दुचाकी वाहनांचा अपघात होवून २ मोटार सायकलस्वार जखमी झाले आहेत.

संबंधीत मळीची वाहतूक करणार्‍या टँकर क्र.एम एच १२ क्यू जी ०३२९ या टँकर चालकाने फलटण-सातारा या मुख्य रस्त्यावर मळी सांडल्यामुळे दुचाकी चालकाचा अपघात झाला. मळी वाहतूक करणार्‍या ठेकेदारांनी दक्षता घ्यावी आणि मळी वाहतूक करणार्‍या टँकर चालकांना सक्त ताकीद देवून मुख्य रस्त्यावरुन जाताना मळी रस्त्यावर सांडणार नाही याची दक्षता घेवून वाहतूक करावी, अशी मागणी सरपंच सौरभ निंबाळकर यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version