शबरीमला मंदिरात मुलीला आडवले

शबरीमला: अनेक वादग्रस्त निकालांपैकी एक निकाल असणारा शबरीमला मंदिरावर काही दिवसांपूर्वी सुनावणी करण्यात आली होती. काही महिला कार्यकर्त्यांनी मंदिरात स्त्रियांना प्रवेश देण्यासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. तसेच स्रियांना येथे संरक्षण देण्यात यावे अशीही मागणी प्रशासनाकडे करण्यात आली होती.
आय्यप्पा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या बारा वर्षाच्या मुलीला पोलिसांनी पंबा येथे रोखले. पुद्दुचेरी येथील ही मुलगी वडिलांबरोबर शबरीमला येथे मंगळवारी आली होती. महिला पोलिसांनी आधार कार्ड तपासले असता तिचे वय १२ वर्षे आढळले त्यामुळे तिला देवस्थाना पर्यंत जाण्यास मज्जाव करण्यात आला. तिचे वडील आणि नातेवाईकांना मात्र दर्शनासाठी सोडण्यात आले. शबरीमाला मंदिरात काल केरळमधून आलेल्या नऊ वर्षांच्या मुलीने देवस्थानाच्या परंपरेचे समर्थन केले ‘प्रतीक्षेसाठी तयार आहे ५० वर्षानंतर मंदिरात प्रवेश करेल.’ असा फलक तिने गळ्यात अडकवलेला होता.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा