मुंबई, 4 ऑक्टोंबर 2021: बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. NCB ने आर्यनची क्रूझमध्ये त्याच्या उपस्थितीबद्दल बराच वेळ चौकशी केली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आर्यन व्यतिरिक्त त्याचे मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धोमेचा यांनाही अटक करण्यात आलीय.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शनिवारी रात्री उशिरा मुंबईहून गोव्याकडं जाणाऱ्या क्रूझ वर छापा टाकला, जिथं मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. यापैकी 8 जणांना एनसीबीने ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली, त्यापैकी तीन जणांना आता अटक करण्यात आली आहे.
आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट आणि या लोकांना अटक
एनसीबीने अटक केलेल्या तीन लोकांमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा समावेश आहे. तर नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांचीही रविवारी दिवसभर चौकशी करण्यात आली. अरबाज मर्चंट आर्यनचा मित्र आहे.
एनसीबीच्या चौकशीदरम्यान आर्यनने काय म्हंतलं
एनसीबीने आर्यनसोबत केलेल्या चौकशीत आर्यनने सांगितलंय की तो गेस्ट म्हणून पार्टीला पोहोचला होता. आर्यन म्हणाला की, त्याला पार्टीत सामील होण्यासाठी पैसे दिले गेले नाहीत. पार्टीच्या आयोजकांनी लोकांना पार्टीत आमंत्रित करण्यासाठी त्याच्या नावाचा वापर केल्याचा दावा त्यानी केला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनसीबीने आर्यनचा फोन जप्त केला आणि त्याच्या चॅट शोधल्या.
NCB ने एक निवेदन जारी करून म्हटलंय की 2 ऑक्टोबर रोजी Cordelia Cruises वर छापा टाकण्यात आला आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्वांचा शोध घेण्यात आला. टीमने तिथून MDMA, कोकेन, MD आणि चरस जप्त केलं.
NCB अधिकारी प्रवासी म्हणून क्रूझवर गेले
एनसीबीचे डीजी एसएन प्रधान यांनी एक निवेदन जारी करून म्हटलंय की, टीमचे 22 अधिकारी साध्या कपड्यांमध्ये प्रवासी म्हणून क्रूझवर गेले होते. जहाजात सुमारे 1800 प्रवासी होते जेथे ड्रग्ज पार्टी करणार्या 8 लोकांना पकडण्यात आले. छापा टाकल्यानंतर, सर्व लोकांना मुंबई एनसीबी कार्यालयात आणण्यात आले जेथे त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
क्रूझ कंपनीच्या अध्यक्षांनी ड्रग्सवर हे स्पष्टीकरण दिलं
ज्या क्रूझवर पार्टी चालली होती ती क्रूझ Cordelia कंपनीची आहे. या कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जर्गेन बैलोम यांनी एक निवेदन जारी केलंय. त्यांनी सांगितलं की, ‘एनसीबीला काही प्रवाशांच्या सामानामध्ये ड्रग्स सापडली, जी ताबडतोब कॉर्डेलियाने उतरवली. यामुळं प्रवास निश्चित करण्यासाठी क्रूझलाही विलंब झाला. यासाठी त्यांनी प्रवाशांची माफी मागितली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे