सोमवती यात्रेनिमित्त खंडोबा म्हाळसा देवाचा शाहीस्नान सोहळा जयाद्रीच्या कऱ्हानदी तीरी संपन्न, लाखो भाविकांची उपस्थिती

जेजुरी १५ नोव्हेंबर २०२३ : राज्याचे कुलदैवत खंडोबा-म्हाळसा देवाचे सोमवती सोहळ्यात कऱ्हासरिता तीरावर पवित्र शाहीस्नान पार पडले. लाखो भविकांच्या उपस्थितीत सोमवती अमावस्या पर्वकाळात प्राचीन खंडोबा म्हाळसादेवी मूर्तींना स्नान घालण्यात आले. या पारंपरिक स्नान सोहळ्याला लाखो भविकांनी हजेरी लावून आपला कुलधर्म कुलाचार निभावला. या प्रसंगी रंबाईमाता ट्रस्टच्या वतीने भविकांकारिता उत्तम सोयसुविधा करण्यात आल्या होत्या.

यंदा पावसाचा अभाव असल्या कारणाने कऱ्हानदी पात्र कोरडे पडले होते. त्यामुळे टँकरच्या पाण्याने मूर्तींना अंघोळ घालण्याची वेळ आली. राज्यभरातून आलेल्या भाविकांनी या वेळी डबके झालेल्या नदीच्या पाण्यात स्नान करीत आपली सोमवती वारी पूर्ण केले. धालेवाडी रंबाईमाता घोडेउड्डाणं ट्रस्टचे अध्यक्ष हनुमंत काळणे आणि शरद काळाने, तसेच सरपंच -उपसरपंच, ग्रामस्थ मंडळ, जेष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे आणि जिल्हापरिषदेच्या माध्यमातून भविकांना अन्नदान तसेच विविध सोयसुविधा पुरविण्यात आल्या होत्या. जेजुरी खंडोबा भक्त परिवाराच्या वतीने पालखी मार्गांवर अन्नदान, फळवाटप करण्यात आले.

ऐतिहासिक काळपासूनच पालखी शाहीस्नानानंतर मार्गस्थ होत पुन्हा खंडोबा गडावर आली. त्याआधी सकाळी देवाचे गुरव पुजारी आणि ग्रामस्थ तसेच खान्देकारी, मानकरी सेवेकरी यांनी परंपरे नुसार गडावरून पालखीचे प्रस्थान कऱ्हानदीकडे केले. यावेळी भाविकांनीं हजेरी लावत यळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष केला. यंदा जेजुरी परिसरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असुन कऱ्हानदी कोरडी पडल्याने देवाच्या शाहीस्नानास टँकरने पाणी आणण्यात आले. तसेच अग्निशमनदलाच्या दोन गाड्यातुन पाण्याचे फवारे उडवण्यात आले. यातच धन्यता मानत भाविकांनी आपले कुलधर्म कुलाचार पूर्ण केले. या भागात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त भंडारा विकला जात असल्याने या सोहळ्यात जेजुरी मार्तंड देवसंस्थान कडून भंडारा उधळण्यास प्रतिबंध केला होता. त्यामुळे भाविकांमध्ये थोडी नाराजी दिसून आली.

न्यूज अनकट प्रतिनीधी : विजयकुमार हरीश्चंद्रे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा