युध्दात शहीद होणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांना 2 ऐवजी 8 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
याबाबतच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
युध्दात जखमी होणाऱ्या सैनिकांच्या मदतनिधीमध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णयदेखील सरकारने घेतला आहे.
सैनिकाच्या कुटुंबियांना सध्या पेन्शन योजनेसह आर्मी ग्रुप पेन्शन, आर्मी वेलफेअर फंड तसेच इतर योजनांनुसार विविध फायदे उपलब्ध् करुन दिले जातात.
युध्दात शहीद होणाऱ्या सैनिकांना सध्या त्यांच्या पद आणि श्रेणीनुसार सरकारकडून 25 ते 45 लाख रुपयांची मदत केली जाते.
याशिवाय आता आठ लाख रुपयांची मदत आर्मी बॅटल कॅज्युअल्टीज् वेलफेअर फंडकडून केली जाणार आहे.