गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा शाहरुख खानने लाँच केले बायको गौरीचे कॉफी टेबल बुक

शाहरुख खानने लाँच केले बायको गौरीचे कॉफी टेबल बुक

मुंबई १७ मे २०२३ : गौरी खान ही देशातील प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर्सपैकी एक आहे. ‘माय लाइफ इन डिझाईन’ असे गौरी खानने लिहिलेल्या कॉफी टेबल बुकचे नाव आहे. बॉलिवूडचा बादशाह,अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानने सोमवारी तिचे पहिले पुस्तक लाँच केले. तिच्या कामसंदर्भातच हे पुस्तक आहे. या बुक लाँच इव्हेंटला गौरीसह शाहरुख खान आवर्जुन उपस्थित होता. यावेळी शाहरुखने पत्नीचे तोंडभरुन कौतुक केले.

या कार्यक्रमात गौरीचे कौतुक करताना शाहरुख म्हणाला, गौरीने वयाच्या चाळिशीत नवी सुरुवात केली. तीने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी तिला माझ्या मित्रांची मदत देऊ केली, पण गौरीने नकार दिला ​​​​​​​आणि आज ती एका वेगळ्या उंचीवर पोहचली आहे. गौरी घरातील सर्वात बिझी सदस्य आहे. सध्या गौरी माझ्यापेक्षाही कामात जास्त व्यस्त असते, आम्ही तिला विचारत असतो की, ती इतकी काम का करते ? कामातून समाधान मिळते असे ती आम्हाला सांगते. जेंव्हा आम्ही घरी एकत्र जेवण करत असतो, त्या वेळी आम्ही आमचा दिवस कसा गेला यावर चर्चा करतो, गौरीच्या मते समाधानी दिवस हा आनंदाचा दिवस असतो, असे शाहरुखने सांगितले.

पुढे शाहरुखने सांगितले की, इंटिरियर डिझायनर म्हणून गौरीच्या करिअरची सुरुवात आमच्या ‘मन्नत’ बंगल्यापासून झाली. मन्नत बंगला खरेदी केल्यावर, मुंबईतील घरे किती महाग आहेत याचा अंदाज आम्हाला आला. तेव्हा हा बंगला अगदी मोडकळीस आला होता. एका इंटिरियर डिझायनरला आम्ही बोलावले होते, परंतु त्याने जास्त पैसे मागितले. अशावेळी मन्नत च्या डिझायनिंग मध्ये गौरीने मला खूप मदत केली. तेव्हा मी गौरीला म्हणालो, तू डिझायनिंग का सुरू करत नाहीस? आणि तेंव्हा ‘मन्नत’पासून गौरीचा ‘इंटिरियर डिझायनर’ म्हणून नवा प्रवास सुरू झाला.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

error: Content is protected !!
Exit mobile version