गोल पोस्ट स्पॉटलाइट वाढदिवसानिमित्त शाहरूखची चाहत्यांना खास भेट

वाढदिवसानिमित्त शाहरूखची चाहत्यांना खास भेट

पुणे, २ नोव्हेंबर २०२२ :बॉलीवूड चा बादशाह, किंग ऑफ रोमान्स, सुपरस्टार किंग खान चा आज ५७ वा वाढदिवस आहे. किंग खानचा वाढदिवस हा त्याच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणा पेक्षा कमी नाही, कारण दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा मन्नत बाहेर त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली. शाहरुखने देखील त्याच्या चाहत्यांना निराश न करता त्यांना घराबाहेर येऊन भेट दिली.

गेल्या ४ वर्षात, २०१८ पासून शाहरुखचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्याचा शेवटचा ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट होता चेन्नई एक्स्प्रेस. झीरो नंतर शाहरूख मोठया पडद्यापासून लांबच होता. त्याला रुपेरी पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर आहेत. पण हिच काय ती किंग खान ची जादू. आजही शाहरूख करोडोंच्या मनावर राज्य करतो.

शाहरूख खानने आज वाढदिवसाचे अवचित्त साधून त्याचा आगामी चित्रपट “पठाण” याचा ट्रेलर रिलीज केला. यात शाहरूख आणि जॉन अब्राहम यांच्यामधे भरपूर अक्शन आणि याचसोबत दीपिका पादुकोनची झलक पाहायला मिळाली. शाहरूख यात एका पठाण च्या भूमिकेत दिसेल आणि एका मिशन दरम्यान त्याला कैद करण्यात आल्याचे दिसत आहे. सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शीत केलेला चित्रपट 25 जानेवारी 2023 या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधि : केतकी कालेकर

error: Content is protected !!
Exit mobile version