ओवेसींवरील हल्ल्याबाबत शहा यांचं वक्तव्य – “विनंती करतो ओबीसींनी संरक्षण घ्यावं, आमची चिंता दूर करावी”

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी 2022: असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राज्यसभेत मंत्रालयाच्या वतीने निवेदन दिलं. ते म्हणाले की, ओवेसी यांचा हापूरमध्ये कोणताही कार्यक्रम नव्हता किंवा ते त्या मार्गावरून निघाल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली नव्हती. शेवटी अमित शाह म्हणाले की, मी ओवेसींना सरकारने दिलेली सुरक्षा घेण्याची विनंती करतो.

ओवेसी यांच्यावरील हल्ल्यावर बोलताना शाह म्हणाले की, 3 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता खासदार जनसंपर्क करून परतत होते. त्यानंतर 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर गोळीबार केला. ही घटना तीन साक्षीदारांनी पाहिली. या घटनेबाबत पिलखुवा येथे एफआयआरही दाखल करण्यात आलाय. त्यावर चर्चा होत आहे.

शहा म्हणाले की, याप्रकरणी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन अनधिकृत पिस्तुल आणि एक अल्टो कार जप्त करण्यात आलीय. फॉरेन्सिक टीम कार आणि घटनास्थळाची कसून चौकशी करत असून पुरावे गोळा करत आहेत.

ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. मी ओवेसी यांना विनंती करू इच्छितो की त्यांनी त्वरित संरक्षण घ्यावं आणि आपल्या सर्वांच्या चिंता दूर कराव्यात.

काय म्हणाले अमित शहा

हापूर – शहा येथे कार्यक्रम नव्हता
आपल्या भाषणात शाह पुढं म्हणाले की, त्यांचा (ओवेसी) हापूरमध्ये कोणताही कार्यक्रम नव्हता किंवा जिल्हा नियंत्रण कक्षाकडं या मार्गाने जाण्याची कोणतीही माहिती नव्हती. ओवेसी सुखरूप दिल्लीत पोहोचले. सध्या दोन्ही आरोपींची चौकशी सुरू आहे. ओवेसी यांना सुरक्षा पुरवण्यास सांगितलं होतं. धोक्याचं मूल्यांकन केलं गेलं ज्या अनुसार Z श्रेणी संरक्षण दिलं आहे. ज्यामध्ये बुलेट प्रूफ कार आणि सीआरपीएफ जवानांचा समावेश आहे. मात्र त्यांनी संरक्षण घेण्यास तोंडी नकार दिलाय.

असदुद्दीन ओवेसी मेरठहून प्रचार सभेनंतर परतत असताना हापूर टोल प्लाझा येथे त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यामध्ये 3-4 गोळ्या झाडण्यात आल्या, ज्याच्या कारवरील खुणा ओवेसींनी स्वतः ट्विट करून दाखवल्या आहेत. हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. त्यानंतर पिलखुवा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.

ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास दिला नकार

कारवर गोळीबाराच्या घटनेनंतर केंद्र सरकारने असदुद्दीन ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्याचं बोललं होतं, मात्र ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला होता. मात्र, AIMIM नेते असदुद्दीन ओवेसी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिल्याचं बोललं होतं. स्वखर्चाने बुलेट प्रुफ वाहनाची मागणी करणार असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. ओवेसी यांच्याकडं शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे आणि त्या परवान्याच्या आधारे ग्लॉक शस्त्रं ठेवण्याची परवानगी घेणार आहे.

ओवेसींच्या गाडीवर हल्ला करणारे दोन्ही तरुण आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. पहिल्या हल्लेखोराला ओवेसींच्या कारच्या चालकाने धडक दिली आणि खाली पाडलं, त्याला पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर अटक केली. दुसरीकडं, दुसऱ्या आरोपीने गाझियाबादमधील पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलं. दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शुभम आणि सचिन अशी दोघांची ओळख पटली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा