पुणे : आज शारीरिक संबंध ठेवणे फार काही नवीन नाही. कारण शरीर संबंध ठेवताना लोक कंडोमचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. यामुळे गर्भधारणा रोखण्यास मदत होते. आज बाजारपेठेत कंडोमचे अनेक फ्लेवर उपलब्ध आहेत.परंतु कंडोम शाकाहारी मिळते हे तुम्हाला माहीत आहे का? बाजारात शाकाहारी कंडोमही उपलब्ध आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की शाकाहारी कंडोम म्हणजे नक्की काय? त्याविषयी अधिक माहिती अशी की,
याबाबत एका संकेत संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी मेंढीचे आतडे कंडोम तयार करण्यासाठी वापरले जात होते. पण त्यानंतर, प्राण्यांमध्ये आढळणारे प्रथिने ‘केसिन’ कंडोम तयार करण्यासाठी वापरण्यास सुरुवात झाली. वास्तविक, प्राणी प्रोटीन केसिनचा वापर कंडोमपासून तयार केलेला रबर सौम्य करण्यासाठी केला जातो.
परंतु शाकाहारी आणि पर्यावरणपूरक लोकांना या कंडोमचा वापर टाळायचा असल्यामुळे बाजारात शाकाहारी कंडोमची मागणी वाढत आहे. “फिलिप सीफर” आणि “वाल्डेमार झेलर” यांनी शाकाहारी कंडोम तयार केले आहे. त्याच्या कंपनीचे नाव आयनहॉर्न आहे.
या कंडोमची खासियत अशी आहे की, हे कंडोम इतर कंडोमप्रमाणे एनिमल प्रोटीन ‘केसिन’ पासून बनविलेले नसतात. फिलिप सिफर आणि वाल्डेमार झेलर यांनी शाकाहारी कंडोम तयार करण्यासाठी झाडांपासून मिळणाऱ्या नैसर्गिक वंगण वापरली आहे. कंडोम मऊ करण्यासाठी या गुळगुळीतपणाचा वापर केला जातो.
आयनहॉर्न कंपनीने गेल्या ३० वर्षांत शाकाहारी कंडोम तयार करण्यासाठी थायलंडमधील लहान शेतकर्यांना सोबत घेत मोठ्या प्रमाणात रबराची झाडे लावली आहेत. या बागांमध्ये कीटकनाशके वापरली जात नाहीत. कंडोम तयार करण्यासाठी हे रबर वापरण्यात येत असल्याने येथिल शेतकऱ्यांनाही चांगले दिवस आले आहेत.