शक्तिकांता दास आज घेणार प्रेस कॉन्फरन्स

नवी दिल्ली, दि. २२ मे २०२०: नरेंद्र मोदी सरकारने वीस लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. हे पॅकेज मोदींनी जाहीर केल्यानंतर अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी या पॅकेजचे सविस्तर स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर आज रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) चे गवर्नर शक्तिकांता दास यांची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे.

यापूर्वी आरबीआयचे संचालक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित सतीश काशिनाथ मराठे यांनी मोदी सरकारच्या मदत पॅकेजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले की, तीन महिन्यांचे मोरेटोरियम पुरेसे नाही एन पी एम मध्ये होत असलेल्या घडामोडींचा ह्या आर्थिक पॅकेजमध्ये समावेश असणे आवश्यक होते.

सतीश काशिनाथ मराठे यांनी सांगितले होते की मोदींनी दिलेले हे आर्थिक पॅकेज अर्थव्यवस्थेसाठी चांगले आहेत, परंतु अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी महत्त्वाचे युद्ध लढणाऱ्या बँकांना यामध्ये विशेष महत्त्व दिले गेले नाही. तीन महिन्यांचे अधिस्थगन पुरेसे नाही. एनपीए, प्रोविजनिंग मध्ये नरमाई इत्यादी मदत पॅकेजचा एक भाग असायला हवा होता जेणेकरून पुन्हा एकदा भारताला प्रगतीच्या मार्गावर नेता येईल.

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते ज्यामध्ये स्थलांतरित मजूर, शेतकरी, मध्यम व लघु उद्योगधंदे इत्यादी क्षेत्रांसाठी तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर आज रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास लोकांसमोर येणार आहेत. आज आपल्या प्रेस कॉन्फरन्स मधून ते काय खुलासा करतील याची सर्वांना उत्सुकता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा