नाशिकमध्ये शालिमार एक्सप्रेसला लागली मोठी आग

15

नाशिक, ५ नोव्हेंबर २०२२: मुंबईहून बिहारला जात असलेल्या कुर्ला शालिमार एक्सप्रेसच्या प्रवासी डब्याला आज सकाळी ८.४० च्या दरम्यान आग लागली होती. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांच्या लक्षात आल्यानं मोठी दुर्घटना टळलीय. कुर्ला शालिमार एक्सप्रेस आज सकाळी मुंबईवरुन बिहारच्या दिशेनं निघाली होती.

कुर्ला शालिमार एक्सप्रेस आज सकाळी नाशिक रेल्वे स्थानकात आली असता, एक्सप्रेसच्या व्हीपीएच म्हणजेच पार्सल भोगीतून धूर येत असल्याचं आरपीएफ जवानांच्या लक्षात आलं. त्यांनी शहानिशा केली असता बोगीला आग लागल्याचं स्पष्ट झालं. वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक दलाला बोलवण्यात आलं.

अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. स्थानकावरील आरपीएफ जवानांच्या समय सुचकतेमुळं पुढील मोठा अनर्थ टळला, या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरपुर सिंग यादव हे परिस्थितीवर लक्षं ठेऊन आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा