गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा शांताबाई फेम संजय लोंढे यांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मदतीचा हात

शांताबाई फेम संजय लोंढे यांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मदतीचा हात

पुणे, दि.१५ जून २०२० : राज्य सरकारने लोककलावंत आणि पडद्यामागचे तंत्रज्ञ व कलाकार यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करावा. त्यांच्यासाठी पॅकेज जाहीर करावे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

शांताबाई या गाण्यामुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले कलावंत संजय लोंढे यांना क्रिएटिव्ह फौंडेशनच्या वतीने सारंग राडकर व संदीप खर्डेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते  किराणा व अन्य मदत दिली.

माझ्यासारख्या अनेक कलावंतांची परवड होत असून मी गणेशोत्सवासाठी काही गाणी शब्दबद्ध केली होती. मात्र आता सर्व उत्सव रद्दबातल झाले आहेत. लॉकडॉउनमुळे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत संदीप खर्डेकर, सारंग राडकर व क्रिएटिव्ह फौंडेशनने केलेली मदत अमूल्य असल्याचे ही संजय लोंढे म्हणाले.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही लोककलावंत व पडद्यामागील कलाकार तंत्रज्ञ यांना मदत देण्याचा प्रयत्न करु असे सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version