बकोरी ०९ फेब्रुवारी २०२१ : बकोरी गावात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ०३ जागा बिनविरोध व ०२ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यामध्ये शांताबाई सत्यवान गायकवाड, व पोर्णिमा सुनील वारघडे, अंजनाबाई मस्कु बहीरट, द्रोपती संतोष वारघडे, लक्ष्मी ज्ञानेश्वर शितकल, ऐश्वर्या संदिप कांबळे, नवनाथ रामदास वारघडे, संतोष राणबा वारघडे, शांताराम रामदास वारघडे हे सर्वजन सदस्य म्हणून निवडून आले होते.
सरपंच पद हे अनुसूचित जाती स्री साठी राखीव होते त्यामध्ये शांताबाई सत्यवान गायकवाड व ऐश्वर्या संदिप कांबळे यांचे सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज आले बोट वर करुण मतदान घेण्यात आले त्यामध्ये शांताबाई सत्यवान गायकवाड या ०८/०१ या फरकाने विजयी झाल्या व ऐश्वर्या कांबळे यांना एकच स्वताच्या मतावर समाधान मानावे लागले.
ऊपसरपंच पदासाठी पोर्णिमा सुनिल वारघडे यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डाॅ. डबेटवार वामन व्ही यांनी काम पाहिले व ग्रामसेवक बापु गव्हाणे यांनी त्यांना मदत केली लोणिकंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप माणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ए. पि. आय. नितिन अतकरे, पोलिस हवालदार श्रीमंत होनमाने यांनी निवडणूक योग्यरीतीने पार पाडण्याबाबत नागरिकांना सुचना केल्या. व मारुती मंदिरात दर्शन घेऊन पांडुरंगाचे मंदिरात सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला तंटामुक्ती माजी अध्यक्ष शहाजी वारघडे यांनी आभार मानले व माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी :- ज्ञानेश्वर शिंदे