शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट सोमवारी

17

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बराच काळ उलटून गेला असला तरी महाराष्ट्रातील सरकार अजूनही स्थापन झाले नाही. भाजप-शिवसेना यांच्यातील मुख्यमंत्रीपदावरून असलेल्या तिढा अजूनही सुटलेला नाही या सर्व घडामोडींमध्ये राज्यातील सत्तास्थापनेच्या कार्यास वेगळेच वळण मिळेल का हा संभ्रम बऱ्याच जणांच्या मनात आहे.
या सर्व घडामोडींचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची सोमवारी दिनांक ४ नोव्हेंबर रोजी दिल्लीत भेट होणार आहे. महाराष्ट्रातील नव्या राजकीय समीकरनान वर यावेळी चर्चा होण्याची शक्यता असल्याचा दावा केला जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय रणनीती विषयी शरद पवार यांची भूमिका जाणून घेतल्यावर सोनिया गांधी या नव्या समीकरण बाबत अंतिम निर्णय घेतील असे काँग्रेसच्या सूत्रांचे मत आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा