गोल पोस्ट महाराष्ट्र ‘राष्ट्रवादी’च्या फुटीनंतर प्रथमच शरद पवार बारामतीत, गोविंदबागेत कार्यकर्त्यांची रिघ

‘राष्ट्रवादी’च्या फुटीनंतर प्रथमच शरद पवार बारामतीत, गोविंदबागेत कार्यकर्त्यांची रिघ

बारामती, १४ ऑगस्ट २०२३ : दीड महिन्यांनंतर बारामतीत मुक्कामी आलेले जेष्ठ नेते शरद पवार यांना भेटण्यासाठी आज सकाळपासूनच त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे. २५ जून पासून पवार कुटुंबियातील प्रमुख राजकीय व्यक्ती असलेल्यांपैकी कोणीही बारामतीत नव्हते, २५ जूनला बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव कार्यक्रमाला कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बारामतीत आले होते. या कार्यक्रमाला शरद पवार तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते.

त्यानंतर आठवडाभरात अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर राष्ट्रवादीत राजकीय उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. या उलथापालथीनंतर या तिन्ही प्रमुख नेत्यांपैकी कोणीही बारामतीला आले नव्हते. रविवारी सोलापूर, सांगोला दौरा आटोपून रात्री नऊच्या सुमारास शरद पवार हे गोविंदबाग या निवासस्थानी दाखल झाले. पवार आल्याचे समजताच आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांची त्यांना भेटायला गर्दी झाली आहे. दीड महिन्यांच्या कालावधीनंतर गोविंदबाग फुलून गेल्याचे चित्र दिसून आले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version