शरद पवारांनी आज बोलावली महाविकास आघाडीची बैठक

मुंबई, १४ मे २०२३: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेल्या पराभव आणि कॉग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुक विचारात घेऊन आज सायंकाळी चार वाजता महाविकास आघाडीची बैठक घेणार आहेत.

गेल्या महिनाभरापासून आघाडीमध्ये बिघाडीचे चित्र दिसत होते. तिन्हीही पक्ष एकमेकांवर सरळ टीका करु लागल्यामुळे या पक्षांची वज्रमूठ विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत राहील की, नाही अशी चर्चा सुरू झाली. मात्र कर्नाटक निकाल लागताच शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बैठकीसाठी पुढाकार घेतला आहे.

महाविकास आघाडीच्या नावाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट एकत्र असले तरी राज्यात वज्रमूठ सभा आयोजित करण्यात ठाकरे सेनेचा सहभाग मोठा होता. सभांची तयारीही एकटा हा गट पहात होता. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते फक्त भाषणापुरते येत असल्याचे जाणवत होते. आता शरद पवार यांनी पहिल्यांदाच आघाडीची बैठक लावण्याचे जाहीर केल्यामुळे तिन्ही पक्षांचे आक्रमक आणि एकीचे राजकारण यापुढे महाराष्ट्रात दिसेल. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा