शरद पवारांची माजी हवाईदल प्रमुख आणि माजी परराष्ट्र सचिवांशी चर्चा

मुंबई, ३ सप्टेंबर २०२०: १५ जूनच्या हिंसक चकमकीनंतर पुन्हा एकदा भारतीय व चिनी सैन्य एकमेकांसमोर आले. २९ व ३० ऑगस्ट रोजी दोन्ही सैन्यांमध्ये पुन्हा वादविवाद झाला होता. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी देखील घुसखोरी करण्याचा प्रयत्न चिनी सैन्यानं केला होता. तसेच चीन सर्व बाजूनेच आता आक्रमक होत चालला आहे. याकडे देखील भारत सरकारने लक्ष ठेवायला हवं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाच्या माजी हवाईदल प्रमुख आणि माजी परराष्ट्र सचिवांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी भारतीय उपखंडाला सर्व दिशांनी चीन वेढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

भारतीय उपखंडाला चीन सर्व दिशांनी वेढत आहे. तसेच दक्षिण चीन समुद्रात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत, याबाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये चीनचा वाढत्या हस्तक्षेपावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. भारताची आर्थिक वाढ थांबवण्याचे चीनचे धोरण असल्याचे म्हणणं शरद पवारांनी व्यक्त केलं.

यावेळी शरद पवारांनी भारताचे माजी हवाईदल प्रमुख भूषण गोखले आणि माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा