मोदींच्या पदवीवरून प्रश्न विचारताच शरद पवार संतापले; केजरीवाल, ठाकरेंना फटकारलं !

मुंबई, १० एप्रिल २०२३: पंतप्रधान मोदींच्या पदवीवरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, देशासमोर बेरोजगारी, कायदा आणि सुव्यवस्था, महागाई अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर केंद्र सरकारला प्रश्न विचारणे सोडून पदवीवरून लक्ष विचलीत केले जात आहे. तुझी पदवी काय आहे ? माझी पदवी काय आहे हा राजकीय मुद्दा आहे का? पदवीच्या मुद्दयावरून ठाकरे- केजरीवालांना पवारांनी सुनावले आहे.

कधी रामाच्या नावाने, कधी अयोध्येच्या नावाने तर कधी दुसऱ्याच्या नावाने राजकारण सुरू झाले आहे. जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर कोणीच बोलत नाही. धर्म आणि जातीच्या नावाखाली रोज नवनवीन घोटाळे सुरू आहेत. सत्ता टिकवण्यासाठी नवनवे डावपेच अवलंबले जात आहेत. नॉन इश्यूच्या नादात खरा मुद्दा चर्चिला जात नाही. देशाचे आणि महाराष्ट्राचे राजकारण सध्या विचित्र झाले आहे.

खरे तर शरद पवार हे असे उद्योग उभारण्याचा सल्ला देत होते की ज्यात जास्तीत जास्त लोकांना काम मिळेल. ते सेवा क्षेत्राऐवजी उत्पादन क्षेत्रावर भर देण्याबाबत बोलत होते, ज्यामध्ये गरीब आणि कमी शिक्षित लोकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील. सेवा क्षेत्र केवळ सुशिक्षित तरुणांनाच रोजगार देऊ शकते. अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या राजकारणाची स्थिती आणि दिशा यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा