Sharad Pawar faction leads anti Inflation protest in Vadgaon: इंधन दरवाढीच्या आणि केंद्र सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी वडगावात जोरदार एल्गार पुकारला. मावळ तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
गेल्या वर्षभरापासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही घट केलेली नाही. याउलट, दरवाढ करून सरकार सर्वसामान्य जनतेच्या खिशातील पैसा लुटत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या भावनांना आंदोलकांनी आपल्या घोषणांमधून वाट मोकळी करून दिली.
या आंदोलनात मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मावळ प्रभारी आणि पुणे जिल्हाध्यक्ष ओबीसी विभाग अतुल राऊत यांच्यासह युवक तालुकाध्यक्ष विशाल वहिले, महिला तालुकाध्यक्ष जयश्री पवार आणि अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष आफताब सय्यद यांनी सक्रिय सहभाग घेतला. संपर्कप्रमुख विजय शिंदे, उपाध्यक्ष माणिक गाडे आणि ज्येष्ठ नेते बारकूभाऊ ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन यशस्वी झाले. कामशेत शहराध्यक्ष संतोष वीर, युवक अध्यक्ष सूरज पुरी, प्रतीक जांभळे, संदीप लोहोर, अनिल खांदवे, योगेश करवंदे, महेश सावंत आणि महादू लोंढे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.
यावेळी आंदोलकांनी नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना आपले निवेदन सादर केले. निवेदनात केंद्र सरकारच्या धोरणांवर कठोर टीका करण्यात आली असून, तातडीने महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, यापेक्षा मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे वडगावात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे