मुंबई: एकीकडे महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटत नाही.त्यासाठी भाजप आणि शिवसेनेत यावरून रस्सीखेच सुरु आहे. यातच आता नवीन चर्चेला उधाण आले आहे. आता शरद पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे बोलले जात आहे.
आज सायंकाळी शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी एक बैठक झाली . या बैठकीत हा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला पाठींबा देण्याची शक्यता असून दोन्ही पक्षांमध्ये सत्तेचे समान वाटप देखील झाले असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यात कॉग्रेसही शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.त्यामुळे शरद पवार मुख्यमंत्री होणार ही चर्चा मात्र चांगलीच रंगू लागली आहे.